राज्यात एनसीबीची मोठी कारवाई; या 3 जिल्ह्यात छापेमारी, 100 किलो ड्रग्ज जप्त

राज्यात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईनंतर आता या तिन जिल्ह्यात छापेमारी केली आहे. यावेळी 100 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  

Updated: Nov 23, 2021, 03:50 PM IST
राज्यात एनसीबीची मोठी कारवाई; या 3 जिल्ह्यात छापेमारी, 100 किलो ड्रग्ज जप्त title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : राज्यात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद, जालना, नांदेडमध्ये एनसीबीने छापेमारी केली आहे. यावेळी 100 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. (NCB's major action in Maharashtra; Raids in Aurangabad, Jalna, Nanded districts, 100 kg of drugs seized)

दरम्यान, त्याआधी मुंबई एनसीबीच्या टीमने नांदेडमध्ये डोडा पावडर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारला. या कारवाईत जवळपास 50 किलो डोडा पावडर एनसीबीच्या टीमने पकडले. तसेच याठिकाणाची 25 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 

नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्टेशन हददीत हा कारखाना चालत होता. याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई एनसीबीची टीम नांदेडमध्ये दाखल झाली. काल दुपारी या टीमने कारखान्यायावर छापा मारला. एका आरोपीला एनसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आठवडाभरापूर्वीच एनसीबीने 1127 किलो गांजा असलेला ट्रक नांदेडमध्ये पकडला होता. 

आता पुन्हा मुंबईच्या एनसीबी टीमने नांदेडमध्ये येऊन डोडा पावडर बनवनाऱ्या कारखान्यावर छाप मारला, नांदेडच्या विमानतळ पोलिसांना याबाबत कल्पना नव्हती का हा प्रश्न उपस्थित होत आहे.