गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमशान घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुसकान झाले आहे. तर, अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत. याच वादळीवाऱ्यात आई वडिलाच्या डोळ्यादेखत लेकराचा जीव गेला आहे. परभणीत पावसासह आलेल्या वादळीवाऱ्यामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. पूर्णा तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस झाला. गौर गावात तर या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आले. चुडावा येथे वादळी वाऱ्यांमुळे घरातील लाकूड अंगावर पडल्याने एका शेतमजुराच्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेला आहे.
गौरव सुनील रनखांबे अस या चिमुकल्याच नाव आहे. त्याचे कुटुंब कामानिमित्त चुडावा येथे वास्तव्यास होते, वादळी वाऱ्यांमुळे ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना चुडावा गाव परिसरात घडली. दुसऱ्या घटनेत धनगर टाकळी येथे झाड बैलांच्या अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू झाला.
अहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातील पानेगावमध्ये वीज पडून तीन एकर ऊस जळाला. शेतकरी रामदास तबाजी गागरे यांच्या 3 एकर उसात वीज पडली. आणि उभ्या उसाला आग लागली. एक वर्ष वाढवलेला ऊस डोळ्यादेखत जळताना पाहताना, शेतकरी रामदास गागरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मार्गावर भीषण अपघात, बसच्या धडकेने दुचाकीस्वार 2 युवकांचा मृत्यू झाला आहे. पांढरपौनी वळणाजवळ कोलवॉशरीमधील कामगार, दुचाकी अचानक बसपुढे आल्याने बस चालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. 31 वर्षीय संदीप सिंह असे आहे एका मृताचे नाव तर अन्य एकाची ओळख पटलेली नाही.