धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...

Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.

Updated: Jan 5, 2023, 12:53 PM IST
धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही... title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या (Digital School) नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे. जिल्ह्याच्या गोरेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या कन्हारटोला (पिंडकेपार) येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळा (School) एका बकऱ्यांच्या गोठ्यात भरत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. तर यामुळे या शाळेतील पटसंख्या देखील एका वर्षात अर्धी झालेली आहे. म्हणून शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नाही का, अशा प्रश्न निर्माण झालेला आहे. (Zilha Parishad Digital School is at goat shed all student from class 1 to 4th under one roof)

गोरेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कन्हारटोला येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून स्लॅप पडत आहे. शाळेला मोठ्या प्रमाणात भेगा देखील पडल्या असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागील वर्षापासून ही शाळा बाजूला असलेल्या एका बकरीच्या गोठयात (Goat Shelter) सुरू आहे. अनेकदा शिक्षण विभागाकडे पत्र व्यवहार देखील करण्यात आले. मात्र शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांचे नाव देखील या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घातले आहे. त्यामुळे या शाळेची पटसंख्या अर्ध्यावर आली आहे. अशी परिस्थिती राहिली तर या शाळेत एकही विद्यार्थी राहणार नाही व शाळा बंद करण्याची वेळ येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

नक्की परिस्थिती काय आणि विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे? 

शाळा डिजिटल असुन इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहे. 20 च्या वर विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे गिरावत होते मात्र मागील एक वर्षा पासून ही शाळा बकऱ्यांच्या गोठ्यात भरत असल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांचे नाव या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकले आहे. त्यामुळे या शाळेत आता फक्त 9 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी देखील म्हटलं आहे की शाळेची इमारत लवकरात लवकर नाही बनल्यास आम्ही सुद्धा आमच्या मित्र मैत्रीणींप्रमाणे दुसऱ्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणार तर शाळा दुसऱ्या ठिकाणी भरविण्यात यावी तसेच शाळेची नवी इमारत लवकरात लवकर तयार करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक, गावकरी करत आहेत.

शिक्षक काय म्हणाले? 

या भागातील शिक्षकही या परिस्थितीमुळे त्रासलेले आहेत. त्यांच्या शाळेची मुख्य इमारत ही पडणाऱ्या अवस्थेत आली आहे. त्यामुळे त्यांनाही या भागात चांगल्या इमारतीत शिक्षण पुर्ण करायचे आहे. सध्या अशाच परिस्थितीत विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रस्त असून त्यांनाही खूप जास्त प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे यावरही प्रशासनाने लवकरात लवकर काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा तेही शिक्षक शाळा सोडून जातील अशी ग्वाही त्यांनीही दिली आहे.