विरोधक संपवण्यासाठी यंत्रणेचा वापर करणे चुकीचेच- संजय राऊत

पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री आमचाच असा विश्वास

Updated: Nov 4, 2019, 12:34 PM IST
विरोधक संपवण्यासाठी यंत्रणेचा वापर करणे चुकीचेच- संजय राऊत  title=

मुंबई : विरोधक संपवण्यासाठी यंत्रणेचा वापर करणे चुकीचेच असे ठाम मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या विशेष कार्यक्रमात कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री आमचाच असा विश्वास देखील व्यक्त केला. 

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सुडाचं राजकारण सुरु आहे. पक्षांतर्गत आणि राजकीय विरोधकांची सुरक्षाव्यवस्था काढायची, यंत्रणा वापरून फाईली शोधायच्या आणि सुडबुद्धीने कारवाई करायची असे प्रकार वाढत चालले आहेत. जे टोलेजंग माणसं असतात, जे नेते लोकांमधले नेते असतात ते यंत्रणेचा वापर करुन एखाद्याच्या मागे लावण्याचे प्रकार करत नाहीत. यंत्रणा ही पक्षातंर्गत विरोधक आणि राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी नसते, अशाप्रकारे कोणीही राज्य करु नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. सहज सर्वकाही मिळालेले आणि कमकुवत कुवत नेत्यांनाच हे करावे लागते असे ते म्हणाले. 

एखादे भ्रष्टाचाराचं प्रकरण विधानसभेत मांडा पण तुम्ही देशामध्ये अशाप्रकारे राज्य करू नये लोकशाही संपेल असेही ते म्हणाले. हा महाराष्ट्र गेल्या ४ वर्षांत नाही घडला आहे. गेली ५०-५५ वर्षे जे मुख्यमंत्री, पक्ष झाले या सर्वांचे योगदान आहे. योगदान एका व्यक्तीचे नसते. उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कोणीही अमरपट्टा घालून आलेला नसतो  

देवेंद्र फडणवीस आमचे व्यक्तीगत भांडण नाही. त्यांनी ५ वर्षे राज्य केले. युतीमध्ये आमच्या वाटेला अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद आहे ते आम्हाला द्या.
वंसतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री पूर्ण काळ राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले आहे. एक शिवसैनिक मी मुख्यमंत्री पदावर बसवणार हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्याप्रमाणे होणार असल्याचा विश्वासही राऊत यांनी यावेळी केला.