झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल

झी २४ तासने दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरणाची बातमी दाखवल्यानंतर या धरणाची गळती थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, अशी माहिती जल सिंचन जलसंधारण उपविभागाच्या अधिका-यांनी दिली.

Updated: Jul 13, 2017, 09:30 AM IST
झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल title=

रत्नागिरी : झी २४ तासने दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरणाची बातमी दाखवल्यानंतर या धरणाची गळती थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, अशी माहिती जल सिंचन जलसंधारण उपविभागाच्या अधिका-यांनी दिली.

या धरणाच्या जॅकवेलमधून गळीत होत असल्याची कबुली देखील जल सिंचन जलसंधारण उपविभाग दापोलीच्या अधिका-यांनी दिलीय. त्यामुळे धरणाची गळती थांबवण्यासाठी तांत्रिक विभागाकडे याचा अहवाल पाठवण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच लवकरात लवकर हे धरण कसं पूर्ण होईल याची देखील खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती दिली. 

खासगी कंपनीला पाणी देण्यासाठी आपल्या विभागाकडे प्रस्ताव आलाय पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्यापही झालेला नाही त्यामुळे आधी धरणात पाणी कशापद्धतीने साठवता येईल याचा विचार केला जाईल आणि धरणाच्या जॅकवेलमधून जे पाणी लिकेज आहे ते काढून जास्तीत जास्त पाणीसाठा साठवण्याचा प्रयत्न जल सिंचन जलसंधारण उपविभाग करेल अशी माहिती सहाय्यक अभियंता यांनी दिलीय.