पटणीटॉप येथे अडकलेल्या यवतमाळमधील पर्यटकांची सुखरूप सुटका

जम्मूच्या पटणीटॉप येथे अतिबर्फवृष्टीमुळे अडकलेल्या यवतमाळच्या सर्व दहा पर्यटकांची लष्काराच्या मतदीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Updated: Jan 25, 2019, 04:31 PM IST
पटणीटॉप येथे अडकलेल्या यवतमाळमधील पर्यटकांची सुखरूप सुटका title=

यवतमाळ : जम्मूच्या पटणीटॉप येथे अतिबर्फवृष्टीमुळे अडकलेल्या यवतमाळच्या सर्व दहा पर्यटकांची लष्काराच्या मतदीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे. लष्कराने अथक परीश्रम करून पटणीटॉप येथे अडकलेले महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह अन्य सर्व पर्यटक आज पहाटे जम्मूच्या कट्टरा शहरात दाखल झाले आहेत. यवतमाळच्या जयहिंद दुर्गा उत्सव मंडळाचे दहा सदस्य वैष्णोदेवी दर्शनासाठी जम्मू-कश्मीरमध्ये गेले होते. दर्शनानंतर हे सर्व पर्यटक कटरा येथून 90 किमी अंतरावर असलेल्या पटणीटॉप येथे बर्फाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते.

मात्र, येथे पर्यटनासाठी आले असताना जोरदार हिमवृष्टी सुरू झाल्याने सर्व रस्ते आणि वास्तव्याची ठिकाणी बर्फाच्छादीत झाली. सतत हिमवृष्टी सुरूच असल्याने पर्यटकांना येथून बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे या पर्यटकांच्या मदतीसाठी लष्कराने प्रयत्न सुरू केले.

रस्त्यांवरील बर्फ हटवून लष्कराने चार दिवसांपासून पटणीटॉप येथे अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. यवतमाळ येथील पर्यटकांनी लष्कराचे आभार मानले आहेत. सुखरुप सुटका झालेले यवतमाळचे सर्व पर्यटक आपल्या जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत.