औरंगाबादच्या महसूल आयुक्तांची चुकीची पोस्टरबाजी

औरंगाबाद महसूल आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम ऐवजी मराठवाडा हगणदारी मुक्ती संग्राम अशी जाहिरात केली. 

Updated: Sep 16, 2017, 09:13 AM IST
औरंगाबादच्या महसूल आयुक्तांची चुकीची पोस्टरबाजी title=

औरंगाबाद : औरंगाबाद महसूल आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम ऐवजी मराठवाडा हगणदारी मुक्ती संग्राम अशी जाहिरात केली. 

लातूर आणि उस्मानाबाद मधे जिल्हा परिषद कडून अशी पोस्टर लावण्यात आली होती. मात्र या बॅनरबाजीमुळे महसूल आयुक्त भापकर चांगलेच अडचणीत आलेत. 

मराठवाडा मुक्ती संग्राम सोबत मिळते जुळते नाव असल्याने यावर शिवसेनेनं आक्षेप घेऊन माफी मागण्याची मागणी केली होती. दरम्यान याबाबत झालेला वाद पाहून महसूल आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केलीय. त्यामुळे पोस्टर वरून सुरु झालेला वादाला पूर्णविराम मिळालाय

औरंगाबाद महसूल आयुक्त, पोस्टरबाजी, डॉ. पुरूषोत्तम भापकर