राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर ढसाढसा रडण्याची वेळ

डोंबिवलीतल्या राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर सध्या ढसाढसा रडण्याची वेळ आली 

Updated: Dec 15, 2020, 10:13 PM IST
राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर ढसाढसा रडण्याची वेळ title=

आतिश भोईर, डोंबिवली : डोंबिवलीतल्या राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर सध्या ढसाढसा रडण्याची वेळ आली आहे. विनया पाटील असं या महिलेचे नाव असून त्या कल्याण डोंबिवलीतील राजकीय पक्षाच्या कार्याध्यक्षा आहे. त्यांचा मुलगा प्रथम पाटील याला गेल्या शनिवारी मिलापनगर इथं मारहाण झाली. 

मारहाणीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पण हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला. मात्र मानपाडा पोलिसांनी आरोपींवर काहीच कारवाई केली नाही, असा आरोप विनया पाटील यांनी केला.

दरम्यान, पोलिसांनी मारहाण प्रकरणी आता २ आरोपींना अटक केली आहे. राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा ढसाढसा रडतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. त्या राजकीय पदाधिकारी असल्यानं चर्चा तर होणारच.