नदीकाठी दोन लहान लेकरं आणि मृतदेह; मावळमध्ये विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा भयानक अंत

Extra Marital Affair : मावळ तिहेरी हत्याकांडाने हादरले आहे. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या मुलांना देखील जिवंत नदीत फेकण्यात आले. 

वनिता कांबळे | Updated: Jul 22, 2024, 07:35 PM IST
  नदीकाठी दोन लहान लेकरं आणि मृतदेह; मावळमध्ये विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा भयानक अंत     title=

Pune Crime : विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा भयानक अंत  झाला आहे. या महिलेसह तिच्या दोन लहान लेकरांचा देखील मृत्यू झाला आहे.  मावळ तिहेरी हत्याकांडने हादरल आहे. आई, आणि तिची दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्ररकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

नेमकं काय घडलं?

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आलेले होते.  या प्रकरणाच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत नवी मुंबई कळंबोली येथे पाठविले होते. महिला आपल्या दोन आणि पाच वर्षाच्या  मुलांना घेऊन नवी मुंबईला आली. 

येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान  महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराचा मित्र महिलेचा मृतदेह आणि तिच्या मुलांना घेऊन पुन्हा मावळमध्ये आला.  9 जुलै 2024 रोजी पहाटे  प्रियकराचा मित्र येथे पोहचला. प्रियकर आणि मित्र  महिलेच्या दोन्ही मुलांना घेऊन  तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नदीमध्ये महिलेचा मृतदेह फेकला. आईला नदीत फेकल्याचे पाहून दोन्ही मुलं रडू लागली. यामुळे घाबरलेल्या प्रियकराने मुलांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. 
या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.  असून त्यांना न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगांव एमआयडीसी हे करीत आहेत.

अनैतिक संबंधातच्या संशयावरून तरुणाची हत्या

अनैतिक संबंधातच्या संशयावरून सोहेल हारून पटेल या 28 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घडली आहे.  सोहेल याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान दरम्यान सोहेल याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत सहा पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून तिघेजण अद्यापही फरार आहेत. आज सकाळीच मयताच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्यामांडल्याने कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे आणि पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने आपल्या फौफाट्यासह कोपरगावात दाखल झाले आणि आक्रमक जमावाला शांत केले. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.