माओवादी संघटनेतील एकमेव महिला सदस्य नर्मदाक्काला अटक

 नक्षलवादविरोधी कारवाईला मोठं यश 

Updated: Jun 12, 2019, 08:29 AM IST
माओवादी संघटनेतील एकमेव महिला सदस्य नर्मदाक्काला अटक  title=
संग्रहित छायाचित्र

गडचिरोली : देशभरात सुरु असणाऱ्या नक्षलवादविरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. माओवाद्यांच्या संघटनेमधील एकमेव महिला सदस्य असणाऱ्या नर्मदाक्काला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी कारवाई करत नर्मदाक्काला अटक केली. सध्या तिची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तिची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

 

 

अटक करण्यात आलेल्या नर्मदाक्काच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. जवळपास गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ती नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या पतीलाही या कारवाईदरम्यान बेड्या ठोकल्या आहेत. फक्त नर्मदाक्काच नव्हे, तर तिच्या पतीवरही गुन्हे दाखल आहेत. 

अनेक दिवसांपासून राज्यात आणि देशातील काही ठिकाणी होणारे नक्षलवादी हल्ले आणि या हल्ल्यांचं वाढतं प्रमाण पाहता यावर आळआ घालण्याच्या दृष्टीने काही मह्त्वाची पावलं उचलण्यात आली होती. त्यातच आता नर्मदाक्काला ताब्यात घेण्यात आल्यामुळे नक्षलवादी कारवाईअंतर्गत येत्या काळात काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय नर्मदाक्काकडून पुढील संभाव्य हल्ल्यांची माहिती मिळवून हे बेत निष्फळ करण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न असेल.

नर्मदाक्का आहे तरी कोण? 
नर्मदाक्का ही नक्षलवादी चळवळ संघटनेतील एक महत्त्वाची सदस्य आहे. ती मुळची आंध्रप्रदेशची आहे. जेथे तिचं शिक्षणही झालं आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश या ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. 

(सविस्तर वृत्त लवकरच)