चेतन कोळस, झी मीडिया, विंचूर : आता बातमी वाईनप्रेमींसाठी.... एक अख्खा दिवस वाईनबरोबर.... वाईनचा ग्लासच काय.... इथे अख्खा हौद वाईनचा होता..... एवढंच काय तर वाईनचं तळं, वाईनचा धबधबा.... असं बरंच काही इथं होतं.... कुठे झाला हा आगळा वेगळा वाईन फेस्टिवल पाहुया.....
वाईनचं तळं.... वाईनचे झरे..... वाईनचा हौद...... विंचूरमध्ये सध्या सगळं वाईनमय झालंय..... निमित्त आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, इंडिया ग्रेप हार्वेस्ट आणि वाईन इन्फॉर्मेशन सेंटर विंचुर यांच्या वतीनं सुरू असलेल्या ग्रेप हार्वेस्ट फेसिट्वलचं..... इथे या आणि वाईन प्या एवढंच नव्हे तर इथे या वाईनमध्ये अक्षरशः आंघोळ करा, वाईनमध्ये मनसोक्त डुंबा, वाईनच्या धबधब्याखाली भरपूर मस्ती करा, अशी भन्नाट संधी या फेस्टिवलमध्ये देण्यात आलीय. या सगळ्याला विनोथेरपी म्हणतात..... हा प्रकार परदेशात प्रसिद्ध आहे......या फेस्टिवलसाठी आलेल्या पर्यटकांनी वाईनच्या आंघोळीचा आणि द्राक्षं तुडवण्याचा यथेच्छ आनंद लुटला....
वाईन ही प्रमाणात घेतल्यास ती आरोग्याला हानिकारक नाही... हाच संदेश देण्यासाठी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं.... वाईनप्रेमींना यानिमित्तानं हा जरा हटके असा अनुभव घेता आला.