'एसटी कर्मचारी संपातील निलंबित कामगारांना सेवेत घेणार का ?'

 एसटी महामंडळानं या सर्वच्या सर्व ८ कामगारांना निलंबित केलंय.

Updated: Jun 9, 2018, 05:31 PM IST
'एसटी कर्मचारी संपातील निलंबित कामगारांना सेवेत घेणार का ?' title=

मुंबई : राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता संप पुकारला असून त्यामुळं ग्रामीण भागाची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या एसटीची सेवा पुरती कोलमडली आहे. ठाण्याच्या खोपट एसटी आगारातही एकूण ३८३ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले असून त्यामुळं अनेक एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आलीये. त्यातच एकूण ९ कंत्राटी कामगारांपैकी ८ कंत्राटी कामगारही या संपात सहभागी झाले आहेत. मात्र आधीच अवैध ठरवण्यात आलेला हा संप आणि त्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अशा संपात सहभागी होण्याचा अधिकारच नसल्याचा ठपका ठेवत एसटी महामंडळानं या सर्वच्या सर्व ८ कामगारांना निलंबित केलंय. त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचं की नाही? हे आता वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवण्यात येणार असल्याची माहिती खोपट एसटी डेपो प्रमुखांनी दिलीये. त्यामुळं हे कामगार आता काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.