Maharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?

Sharad Pawar resignation: वस्ताद आपला एक डाव नेहमी राखून ठेवतो. आपला शिष्य ज्यावेळी वरचढ ठरतो, त्यावेळी वस्ताद आपला हा डाव टाकतो. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने झुकल्याने शरद पवार यांनी राजीनाम्याची रणनिती आखली का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: May 4, 2023, 10:30 PM IST
Maharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?  title=
Maharastra Politics,Sharad Pawar, NCP

NCP President : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडवून दिली. मात्र आता खुद्द शरद पवारांनी राजीनामा (Sharad Pawar Resign) मागे घेण्याचे संकेत दिलेत. गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलनला बसले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी गुरुवारी स्वतः या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. त्यावेळी त्यांनी राजीनाम्याबाबत फेरविचार करण्याची भूमिका मांडली.

काय म्हणाले शरद पवार?

माझा निर्णय घेण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती तर मला खात्री होती की तुम्ही मला राजीनामा देऊ दिला नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू, असं पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

आणखीव वाचा - राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

दरम्यान, शरद पवार खरंच राजीनामा मागे घेणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे. याबाबत राजकीय वर्तुळात 5 शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. यावर राजकीय तज्ज्ञांनी भाकित वर्तविलं आहे.

1) शरद पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहणार.

2) कार्यकर्त्यांचा दबाव लक्षात घेता शरद पवार राजीनाम्याचा निर्णय मागे घेणार.

3) शरद पवार अध्यक्षपदी कायम राहतील आणि सोबत एक कार्याध्यक्ष नेमण्यात येईल.

4) शरद पवार पक्षाध्यक्ष नसतील तर दुसऱ्या फळीतील अनेक मातब्बर नेते राष्ट्रवादी सोडून जातील.

5) 2024 च्या निवडणुकीनंतर निवृत्ती स्वीकारावी, असा प्रस्ताव शरद पवार मान्य करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष (New NCP President) निवडण्यासाठी नेमलेल्या समितीची बैठक शुक्रवारी सकाळी पक्ष कार्यालयात होणार आहे. त्यानंतरच पवारांच्या गुगलीचा नेमका अर्थ काय? हे स्पष्ट होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. असं म्हणतात, वस्ताद आपला एक डाव नेहमी राखून ठेवतो. आपला शिष्य ज्यावेळी वरचढ ठरतो, त्यावेळी वस्ताद आपला हा डाव टाकतो. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने झुकल्याने शरद पवार यांनी राजीनाम्याची रणनिती आखली का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

दरम्यान, 2019 च्या बंडात आघाडीवर असणारे धनंजय मुंडे यांच्यासह अण्णा बनसोडे, नितीन पवार, शेखर निकम. अनिल पाटील, धर्मरावबाब आत्राम, संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, मनोहर चंद्रिकापुरे, यशवंत माने, राजू नवघरे, दत्तामामा भरणे यांचा समावेश होता. तर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी जाऊन भेट घेणाऱ्यांमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख आणि खासदार सुनील तटकरे यांचा समावेश होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थिती शरद पवार यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली का? असा सवाल विचारला जात आहे.