ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार : विजय वडेट्टीवार

 जालना शहरात VJNT, NT, SBC आणि OBC समाजाचा भव्य महामोर्चा

Updated: Jan 24, 2021, 07:21 PM IST
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार : विजय वडेट्टीवार  title=

जालना : ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालना शहरात VJNT, NT, SBC आणि OBC समाजाचा भव्य महामोर्चा निघाला. या मोर्चाच्या समारोपावेळी वडेट्टीवारांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनाही उजाळा दिला. मुडेंनी ओबीसींसाठी जे कार्य केलं, त्याला सलाम करत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. 

केंद्र सरकारनं ओबीसींची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. जनगणना झाल्यास ओबीसींसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करता येणार आहे. त्यामुळे हा मोर्चा ओबीसी मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचा असल्याचं समन्वय समितीनं सांगितलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. मात्र त्यांना एस इ बी सी मधून आरक्षण द्यावं, अशी मागणी जानकरांनी जालन्यात केली. आमच्या हक्काचे कुणी काढून घेईल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला.मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, रासप अध्यक्ष महादेव जानकर या मोर्चात सहभागी झाले होते.