Jayant Patil Exclusive Interview: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचं काय होणार? शरद पवार राजीनामा मागे घेणार की नाही? राष्ट्रवादीचं भविष्य कोणाच्या हातात असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच झी 24 तासच्या ब्लॉक अँड व्हाईट (Black & White) मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अनेक खुलासे केले आहेत.
शरद पवार यांनी अचानक निर्णय घोषित केला, त्यामुळे कार्यकर्त्यांसह अनेकांच्या भावनेचा उद्रेक झाला. सर्वांचं समाधान करणारी व्यक्ती म्हणून आजही आमच्या पक्षात किंवा देशपातळीवर शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आपुलकीची भावना आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना पवारसाहेबांनी तयार केलंय, असं जयंत पाटील म्हणतात.
येत्या 8 महिन्यात लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर राज्याची विधानसभा आहे. एवढ्याच काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा बँड शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला 4 वर्ष वेगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
1999 साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली, त्यावेळी अनेकजण जोडले गेले. त्यामुळे सरदारांनाच नाही तर अनेक इतर नेत्यांना तयार काम करण्याचं काम राष्ट्रवादीने केलंय. पक्षाने घेतलेला निर्णय पवार साहेबांनी नेहमी मान्य केलाय. 23 जणांची समिती होती, आम्ही निर्णय मागे घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला विचार करायला वेळ हवा असं उत्तर शरद पवार यांनी आम्हाला दिलंय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
सर्वजण पक्षातील घटनेबाबत राजकीय अर्थ काढतात. मी शरद पवार यांच्याशी अडीच तास घालवले. त्यांनी माझ्या विनंती पुरेशी दाद दिली नाही. आता त्यांनी सांगितलंय की, विचार करायला वेळ हवाय. माझी निष्ठा ही शरद पवार यांच्यासोबत आहेत. मला समोरून आमंत्रणंही आले होते. मात्र, आम्ही कुठं जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.
महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाचा संबंध नाही. पवार साहेबांची इच्छा होती की तरुण नेतृत्व तयार करावं. मात्र, अनेकांना मान्य नाही, असा खुलासा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. भाजपकडे जाण्याचा अनेकांची इच्छा होती, शरद पवारांनी देखील यावर भाष्य केलं होतं, यावर आपली भूमिका काय आहे?, असा सवाल जयंत पाटलांना विचारण्यात आला होता.
आणखी वाचा - Maharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?
पक्षात काही लोकं असू शकतात, ज्यांना भाजपसोबत जाण्याची इच्छा असले. काही नेत्यांची संख्या असू शकते. मात्र ती फार क्वचित प्रमाणात असेल, माझ्यासमोर कोणी भूमिका मांडली नाही, असं जयंत पाटील म्हणालेत. शिंदे गटाला खूपच कमी प्रतिसाद मिळतोय, असं मला वाटतंय. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीची धाकधूक असेल, असंही ते म्हणतात.
जर महाविकास आघाडीने मिळून निवडणूक लढवली, तर 170 ते 180 जागा महाविकास आघाडीला मिळेल, तर 100 च्या आत शिंदे-भाजप गुंडाळली जाईल, अशी भाकित देखील जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलंय.
पाहा मुलाखत
दरम्यान, कार्यध्यक्षपदाची चर्चा झालीच नाही, अशी माहिती देखील पाटील यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे. शरद पवार यांनी थांबल्याचा निर्णय घेतला तर हा आज निर्णय सहन करण्याची क्षमता आमच्यात नाही. राज्यस्तरावर पक्षात नेतृत्व अनेक आहे.