मुख्यमंत्र्यांनी दोन गुन्हे का लपवले? - प्रकाश आंबेडकर

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवरील दोन गुन्हे लपवलेत का?"

Updated: Oct 14, 2019, 11:13 AM IST
मुख्यमंत्र्यांनी दोन गुन्हे का लपवले? - प्रकाश आंबेडकर title=
संग्रहित छाया

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवरील दोन गुन्हे लपवले असून ते दोन गुन्हे नेमके कोणते आहेत हे स्पष्ट करण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. ते लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजा मणियार, निलंगा येथील डॉ. अरविंद भातम्बरे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.  जर मुख्यमंत्री हे खरंच लोकांमधील मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी गिरीष महाजन सारख्या पुरामध्ये सेल्फी काढणाऱ्या 'सेल्फी बहाद्दर' मंत्र्यांचा राजीनामा का नाही घेतला, असा सवालही त्यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजपकडून दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. यातून ते राजकीय पोळी भाजून घेत आहे. दंगलीशीवाय भाजपचे राजकारण होऊ शकत नाही. सत्ता मागण्यामागचे वेगळेच कारण आहे. ते बॉम्ब फोडण्यासाठी सत्ता आगत आहेत, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणालेत, भाजपचे सरकार लुटारूचे सरकार आहे. भाजप संघटित गुन्हेगाराची टोळी आहे. भाजप ही संघटीत टोळी आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भाजपने एका व्यासपीठावर यावे. मी त्यांना पुरावे देईन, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ते बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.