वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचा पलटवार

 मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का?  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Updated: Sep 4, 2023, 06:42 PM IST
वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचा पलटवार title=

Udhhav Thackrey : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का?  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाटी जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली.  

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जालन्यात बेछूट लाठीचार्ज केला. मी तिथे जाऊन पाहिलं. आपलं पण सरकार होतं, पण आपल्या सरकार वेळी लाठीचार्ज झाला का? बारसुला देखील असंच लाठीचार्ज केला, वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. हम करे सो कायदा अशा सरकारला तोडून मोडून टाकायचं आहे.  पक्ष फोडायचा...कोणी आंदोलन करत असतील तर त्यांना मारायचं हे या सरकारचं काम आहे.  आता जे डोकी फोडलीत त्याचं श्रेय टीमवर्क म्हणून घ्यावं. मी गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो.  आता तर एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा. हे टीमवर्क आहे. तीन तिघाडी सरकार आहे. बारसु मध्ये लाठीचार्ज, वारकाऱ्यांवर लाठीचार्ज केला.  हे निर्घृण सरकार आहे फडणवीस यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 

देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान खूप तोकडा आहे. वटहुकूम केंद्र काढतं. मंत्रालयाच्या आजूबाजूला देखील फडणवीस यांनी फिरू नये. त्यांचं ज्ञान खूप तोकडं आहे. ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या सोबत आलेत. त्यांच्याकडे पुरावे मागा. पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. जो काही निकाल बदलायचा आहे तो केंद्र बदलू शकतो. गणपती च्या काळात जे अधिवेशन बोलावलं आहे, असं काय आहे ज्यामुळे त्यांनी अधिवेशन बोलावलं माहीत नाही. पण, त्यांनी सगळ्या समाजाच्या आरक्षणविषयी बोलावं.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन येत नाही तोवर उपोषण सोडणार नाही - मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

सरकारचं शिष्टमंडळ जोवर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन येत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. मात्र सरकार अध्यादेश काढेल असा आपल्याला विश्वास वाटतो असंही जरांगे-पाटील यांनी म्हंटलंय. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासोबत लाठीचार्ज करणा-यांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी लावून धरलीय. 

 हे राजकारणी तुम्हाला आरक्षण देणार नाहीत - राज ठाकरे यांचा हल्ला बोल

राज ठाकरेंनी आज अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत मराठा आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. मराठा आंदोलकांना लाठीचार्ज करण्यासाठी आदेश देणा-यांना आधी मराठवाडा बंदी करा. त्यांना फिरू देऊ नका. हे राजकारणी तुम्हाला आरक्षण देणार नाहीत. ते मतांसाठी वापर करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर, फडणवीसही विरोधात असते तर त्यांनीही राजकारण केलं असतं असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला...