अदर पूनावाला आणि केंद्र सरकारने 'या' गोष्टीचा खुलासा करावा, नाना पटोलेंची मागणी

 धमकी देणारे कोण याचा खुलासा पूनावाला यांनी करावा असे आवाहन

Updated: May 3, 2021, 11:23 AM IST
अदर पूनावाला आणि केंद्र सरकारने 'या' गोष्टीचा खुलासा करावा, नाना पटोलेंची मागणी title=

मुंबई : मी भारतात परतणार नाही. इथे माझ्या जीवाला धोका असल्याचं विधान सिरम इंस्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला (Adar Punawala) यांनी केले होते. त्यानंतर मी भारतात परत येतोय असे पुनावाला यांनी म्हटलंय. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेस त्यांचं स्वागत करतंय. 

या संकटात पूनावाला यांना कुणी धमकावले होतं याचा खुलासा त्यांनी करायला हवा असे पटोले म्हणाले. 

पूनावाला यांनी भारतात परत येऊन देशासाठी लस उत्पादन करावं, काँग्रेस त्यांना सुरक्षा देईल असे पटोल म्हणाले. धमकी देणारे कोण याचा खुलासा पूनावाला यांनी करावा असेही ते म्हणाले.

पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी मागणी केली नसताना केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा का पुरवली, यामागचा खेळ काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस पूनावाला यांचं संरक्षण करायला तयार आहे. त्यांनी देशातील लोकांना लस पुरवण्याचं काम करावं असे पटोले म्हणाले.

पूनावाला यांना वाय प्लस सुरक्षा दिली होती. यामागचं कारण काय ? हेही तपासलं पाहिजे. त्यांनी सुरक्षा मागितली नसताना केंद्र सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली त्या मागचा खेळ काय आहे ? पूनावाला आणि केंद्र सरकारने याचा खुलासा करायला हवा असे पटोले म्हणाले. 

पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली. रेकी करण्यासाठी केंद्र सरकारने हे केलं असावं असा संशय असल्याचे ते म्हणाले.

भाजपने सांगितलं शिवसेनेने त्यांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलन करणे वेगळे आणि फोनवर शिरच्छेद करण्याची फोनवर धमकी देणं वेगळं. फोनवर धमकी देणारा व्यक्ती मोठा आहे असा त्यांनी खुलासा केला असल्याचे पटोले म्हणाले.

आपल्या देशात लसीकरण न झाल्याने लोकांचा जीव जातोय याला केंद्र सरकारचा नियोजन शून्यता कारणीभूत असल्याचे पटोले म्हणाले.