राज्याच्या राजकारणात 'शकुनी मामा' कोण? अमोल कोल्हे यांनी येवल्यात उठवलं रान, म्हणाले...

Amol Kolhe Speech: मला काही कळेना झालंय... मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं.

Updated: Jul 8, 2023, 06:25 PM IST
राज्याच्या राजकारणात 'शकुनी मामा' कोण? अमोल कोल्हे यांनी येवल्यात उठवलं रान, म्हणाले... title=
Amol Kolhe speech in yevla ncp shabha

Amol Kolhe On Devendra Fadanvis: वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले आहेत. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेतली. शरद पवारांच्या भाषणाआधी खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी सभा दणादून सोडली.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

सध्याची ही लढाई ही अधर्माची आहे. महाभारताचा विचार करतो, तेव्हा हाच तो शकुनी मामा आहे, ज्याच्यामुळं महाभारत घडलं. आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो. त्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. त्यापलीकडे जाऊन संस्कृती अशी होती, की काही आक्रमण आलं तर कौरव पांडव भाऊ होते, ते एकत्र येऊन मुकाबला करत होते. मात्र, त्यात मिठाचा खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामा याने. आता हा शकुनी मामा कोण? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मला काही कळेना झालंय... मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं. मला कमळाचं फुल दिसलं, असंही कोल्हे म्हणाले. भावाभावात भांडणं लावणाऱ्यांना जागा दाखवा. राज्यातील जनता शरद पवार यांच्या पाठिशी आहे. सत्तेसाठी त्यांच्यातील शकुनी मामा जागा झाला आणि आता फासे टाकायला लागला, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टोले लगावले.

आणखी वाचा - 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...

दरम्यान, ईडी आता काहींसाठी देवस्थान झालंय. हा फक्त ट्रेलर आहे. राज्यातील जनता भाजपला जागा दाखवेल. तत्वांसाठी शरद पवार आजही लढत आहेत. काही म्हणतात, पांडुरंगाला बडव्यांनी घेरलंय. अरे पांडुरंग त्यांना कळलाच नाही. पिच्चर अभि बाकी है, म्हणत अमोल कोल्हे यांनी येवल्यात रान उठवलं.