रत्नागिरी : शिवशाही बस चालकाने साजरी केलेल्या गटारीचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागलाय. रत्नागिरीहून बोरीवलीच्या दिशेने जाण्यासाठी ही शिवशाही बस निघाली होती. प्रवासात गाडी प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी निवळी इथल्या नियोजित थांब्यावर थांबली. यावेळी चालक गाडी सोडून खाली उतरून गेला... तो बराच वेळ परतलाच नाही... त्यामुळे मग प्रवाशांनीच चालकाची शोधाशोध सुरू केली.
बराच वेळ चालक न आल्याने प्रवाशी संतापले होते... त्यातच चालक निवळी थांब्यावरच्या एका टपरीवर आडवा झाल्याचं दिसला. त्यानं मद्यप्राशन केलं होतं... त्यामुळे त्याला उठवावं की नाही? या पेचात प्रवासी अडकले. प्रवाशांनी मदतीसाठी प्रशासनाकडे संपर्क साधला.
मग प्रवाशांनी शेवटी निवळी इथल्या एका हॉटेलमध्येच आसरा घ्यायचा निर्णय घेतला... एसटीचे वरीष्ठ अधिकारीही घटनास्थळी रात्री उशिरा पोहचले. एसटी विभागानं दुसरा चालक देऊन गाडी मुंबईच्या दिशेने रवाना केली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय.