Weekend Lockdown : शनिवार-रविवारसाठी मार्गदर्शन सूचना जारी; या गोष्टींना परवानगी

शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनबाबत सूचना 

Updated: Apr 9, 2021, 04:26 PM IST
Weekend Lockdown : शनिवार-रविवारसाठी मार्गदर्शन सूचना जारी; या गोष्टींना परवानगी title=

आतिश भोईर, कल्याण : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. 

कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी दोन दिवस आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी शनिवारी - रविवारी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहेत.

शनिवार-रविवार लॉकडाऊनबाबत सूचना...

- विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही. हॉल तिकीट दाखवून प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे. 

- ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो, स्विगी आदींना 24 तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी...

- अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, फळविक्रेते, मिठाई यांची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहतील.

- मटण-चिकन-अंडी-मासे विक्री दुकाने आठवडाभर नियमांचे पालन करत सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहणार..

- भाजीपाला विक्रेते 6 फूट अंतर ठेऊन आणि वर्तुळ काढून विक्री करणार...

- औषध दुकाने, हॉस्पिटल यांना वेळेचे बंधन नाही..

- पीठ गिरणी आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सुरू राहणार.

- आईस्क्रीम, ज्यूस, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्याच्या कडेचे स्टॉलला फक्त पार्सल विक्रीस परवानगी. होम डिलिव्हरी करणार असेल तरच सुरू अन्यथा बंद ठेवायचे.

- वाईन शॉप 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत.

- चष्मे दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 सुरू ठेवण्यास परवानगी

- चार्टर्ड अकाऊंट आणि वकील यांचे ऑफिसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत परवानगी.