राज्य सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरणाचे नियोजन नाही; रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

Updated: Apr 9, 2021, 04:15 PM IST
राज्य सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरणाचे नियोजन नाही; रामदास आठवले title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या गलथानपणामुळे 5 लाख लस वाया गेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य  कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यांचा योग्य वापर करावा;  तोपर्यंत केंद्र सरकार आणखी डोसचा पुरवठा लवकरच करणार आहे. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा पडू देणार नाही.

महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीर उभे असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले.

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असल्याचा चुकीचा आरोप राज्य सरकार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज रामदास आठवले यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी दूरध्वनीद्वारे  चर्चा केली. कोरोना लसीकरणा वरुन राज्य  सरकार ने राजकारण करू नये  तर योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे असे आवाहन आठवले यांनी राज्य सरकारला केले.

महाराष्ट्राला केंद्र सरकारने यापूर्वीच 1कोटी 6 लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे. त्यातील 5 लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण ? असा सवाल करीत राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्राला लागेल तेव्हढी लस केंद्र सरकार देणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, आठवले यांनी शुक्रवारी दुपारी जे जे रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सीमा आठवले बहीण शकुंतला आठवले यांनी लसीचा डोस घेतला,