नागपुरात बुधवारी 1461 कोरोनाबाधित

काल झालेल्या पहिल्या मृत्युने अगोदरच वाढवली आहे चिंता

Updated: Jan 12, 2022, 07:31 PM IST
नागपुरात बुधवारी 1461 कोरोनाबाधित title=

नागपूर- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस नागपुरात वाढत आहे.असून पाच दिवसापासून 700 ते 900 दरम्यान वाढणारी बाधितांची संख्या
आज तब्बल 1461 पर्यंत पोहचली आहे.तिस-या लाटेत प्रथमच नागपुरात कोरोनाबाधित हजारपार गेले आहे. कालच तिसरा लाटेत
पहिला मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढवली असताना आज वाढलेली बाधितांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे.
    ओमीक्रॉन आणि कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना बधितांसह सक्रिय रूग्ण संख्येत वाढ होत आहे.
कोरोनामुक्तांचे प्रमाण घटल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात 12729 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये शहरात 1157,ग्रामीणमध्ये 236 तर जिल्ह्याबाहेरील 41 कोरोनाबाधित आढळले.काल 799 कोरोनाबाधित आले असताना
आज जवळपास दुप्पट रुग्ण नव्यानं आले आहे.दरम्यान काल नागपुरात तिस-या लाटेतील
पहिल्या मृत्यूचीही नोंद झाली आहे शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असताना तिसर्‍या लाटेत पहिला मृत्यू झाल्याने आरोग्य
विभागाची चिंता वाढवणार आहे.