Cyclone Biparjoy Latest Update: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यांनी रौद्र रुप धारण केलं आणि पाहता पाहता भारताच्या किनारपट्टी भागावर Biparjoy नावाचं चक्रिवादळ घोंगावू लागलं. मुळात सुरुवातीला या वादळाचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला बसतोय की काय अशी भीती असतानाच वादळानं मार्ग बदलला आणि ते गजरातवरून थेट कराचीच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे.
हे वादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत, जाखाऊ बंदर (गुजरात) जवळील मांडवी आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता असून अखेरच्या टप्प्यात ते अतिशय तीव्र चक्रिवादळाच्या रुपात धडकी भरवेल. इतकंच नव्हे, तर यावेळी 120-130kmph वेगानं वारे घोंगावणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान सदरील परिस्थिती पाहता सौराष्ट्र किनाऱ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. (weather updates cyclone Biparjoy monsoon in maharashtra )
गुजरात किनाररपट्टी भागात वादळाची तीव्रता पाहता या भागात सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि कोस्ट गार्ड या सर्वच यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय लष्कराच्या तुकड्याही हवमानाच्या या बदलांवर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक यंत्रणांच्या माहितीनुसार आतापर्यंत गुजरातमध्ये जवळपास 50 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे. गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या 70 रेल्वे गाड्याही सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.
खासगी हवमानसंस्था Skymet च्या वृत्तानुसार पुढच्या 4 आठवड्यांमध्ये पर्जन्यमान कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार आहे.
#WATCH | Gujarat: Mandvi witnesses rough sea conditions and strong winds under the influence of #CycloneBiporjoy
As per IMD's latest update, VSCS (very severe cyclonic storm) Biparjoy to cross Saurashtra & Kutch & adjoining Pakistan coasts b/w Mandvi & Karachi near Jakhau Port… pic.twitter.com/QmebPZCsKQ
— ANI (@ANI) June 15, 2023
ध्या सुरु असणाऱ्या बिपरजॉय चक्रिवादळामुळं मान्सूनचा वेग मंदावला असून हा वेग साधारण 18 ते 21 जून रोजी पूर्ववत होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तेव्हा आता मान्सूनची वाट पाहण्यावाचून पर्याय नाही हेच जवळपास स्पष्ट होत आहे. दरम्यान, सध्या मान्सून महाराष्ट्रात पोहोचला असला तरीही त्याचा प्रवास तळकोकणातून पुढे अपेक्षित वेगानं होत नाहीये. त्यामुळं मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये उष्णतेचा दाहसुद्धा जाणवरणार आहे.