Weather Updates विदर्भ-मराठवाड्यात आज पुन्हा अवकाळी पावसाचा अलर्ट

राज्यात एकीकडे वाढणारी थंडी आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Updated: Jan 10, 2022, 12:13 PM IST
Weather Updates विदर्भ-मराठवाड्यात आज पुन्हा अवकाळी पावसाचा अलर्ट title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: राज्यात सध्या वातावरणात खूप मोठे बदल होत आहेत. काही भागांमध्ये अजूनही अवकाळी पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात तापमानाचा पार कमालीचा खाली उतरत आहे. त्यामुळे गारठा वाढला आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे. 

उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4 ते 5 दिवस अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे याचा परिणाम 9 ते 13 जानेवारी दरम्यान दिसरणार आहे. भारतात काही राज्यांमध्ये मध्यम आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गारठाही वाढू शकतो. 

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांमध्ये आज गारा पडण्याची देखील शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आलं आहे. 

आज परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट होऊ शकते. ऐन थंडीत अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.

दुसरीकडे गेल्या दोन दिवसात राज्यात तापमानात मोठा बदल होत आहे. राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. 9 जानेवारी रोजी  उत्तर महाराष्ट्रात, कमाल तापमान खाली घसरलं होतं. आज उ मध्य महाराष्ट्र, उ कोकण मुंबईसह व संलग्न मराठवाडा भाग, तसेच विदर्भात तापमानाचा पारा खाली घसरला आहे. 

सांताक्रूझ 13.2, कुलाबा 15.2, डहाणू 15.5, ठाणे 18, माथेरान 10.6, पुणे 12, बारामती 13.8, नाशिक 7.3, जळगाव 9, मालेगाव 10.2, सांगली 15.9,  नांदेड 17.6, चिकलठाणा 11, जालना 12, परभणी 16, सातारा 15, उस्मानाबाद 16.4