Seat Belts : वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'हा' नियम पाळला नाहीतर उद्यापासून पोलीस फाडतील पावती...

Traffic Police :  वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते. मात्र आता मागील बसलेल्या प्रवाशांना देखील सीटबेल्ट लावणे गरजेचे असणार आहे. 

Updated: Oct 31, 2022, 10:18 AM IST
Seat Belts : वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'हा' नियम पाळला नाहीतर उद्यापासून पोलीस फाडतील पावती...  title=

seatbelt car action : आपल्या देशात वाहतुकीशी संबंधित वेगवेगळे नियम (Traffic Rules) आहेत आणि हे नियम मोडल्यास नागरिकांना दंडही भरावा लागतो. पण तरीही भारतातील लोक या नियमांच्या बाबतीत उदासीन आहेत. दुचाकीवर हेल्मेट (helment) वापरावे, गाडी चालवताना लायसन्स आपल्याबरोबर बाळगावे, फोनवर बोलू नये, सीट बेल्ट लावावे, हे काही साधारण नियम आहेत. 

याचदरम्यान  चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक (Seatbelt mandatory) करण्यात आला आहे. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था (Seatbelt arrangement) नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली 15 दिवसांची मुदत आज सोमवारी संपत आहे. त्यामुळे सहप्रवाशाला केलेल्या हेल्मेटसक्तीप्रमाणे ही सक्तीदेखील बारगळण्याची शक्यता आहे.

देशभरातील अनेक राज्यांमध्ये रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून नवी दिल्लीत चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असाच नियम मुंबईतदेखील लागू करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी 14 ऑक्टोबरला जाहीर केले की,  मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास दंडास पात्र असल्याची तरतूद आहे.

वाचा : भारताच्या 'या' खेळाडूने वाचवली लाज, अर्धशतकासह गोलंदाजांची धुलाई   

त्यामुळे सहप्रवाशांना सीटबेल्टची सुविधा नसल्यास वाहनचालकांनी सोमवारी 31 ऑक्टोबरपर्यंत सीटबेल्ट बसवून घ्यावेत. 1 नोव्हेंबरपासून सहप्रवासी विनासीटबेल्ट आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक करावी केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले होते.

वाहतूक पोलिसांनी दिलेली मुदत 31 ऑक्टोबरला संपत असल्याने मंगळवारपासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट (setblet) लावला नसेल तर इ चलान कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. ओला, उबर (ola uber ) यांसारख्या अॅपवरील टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी काळी-पिवळी टॅक्सीमध्ये हे बेल्ट बसविण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ही सक्ती आम्हाला नसल्याचे टॅक्सीचालक (taxi) म्हणत असले तरी कारवाई सरसकट सर्वांवर केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.