नागपूर विधीमंडळात पाणीच पाणी, बत्ती गुल

नागपूर पावसाळी अधिवेशन पाण्यात...

Updated: Jul 6, 2018, 10:44 AM IST
नागपूर विधीमंडळात पाणीच पाणी, बत्ती गुल title=

नागपूर : आताची सर्वात मोठी बातमी येते आहे ती नागपूरच्या विधीमंडळातून. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. विविध मुद्दयावर हे अधिवेशन गाजेल असं बोललं जात असतांनाच आज विधीमंडळात पाणी साठल्याने आणि वीज गायब झाल्याने कामकाज ठप्प झालं आहे. दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. आमदार पाण्यात उभे असतांना दिसत आहे. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे आणि त्याच्याच फटका विधीमंडळाच्या कामकाजाला बसला आहे. नागपुरात सकाळपासून संततधार सुरु आहे. विधीमंडळाच्या कंट्रोल रुममध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधिमंडळातील वीज गायब झाल्याने मोबाईल टॉर्चच्या उजेडात विरोधकांनी आंदोलन सुरु केलं आहे. विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक होत असतांनाच आता विरोधकांना आणखी मुद्दा मिळाला आहे. पाणी कसं भरलं याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.