ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदी मंदिरातून प्रस्थान

आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल

Updated: Jul 8, 2018, 11:32 AM IST
ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदी मंदिरातून प्रस्थान title=

आळंदी : ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच आज आळंदी मंदिरातून प्रस्थान होत आहे. या वारीसाठी आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. कपाळी अष्टगंध, गळ्यात,  तुळशीची माळ, हातात भगवी पताका असलेल्या या वारक-यांनी  अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होईल. या प्रसंगी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस असा दुहेरी पोलीस बंदोबस्त आळंदीत तैनात आहे.