राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुढचे 5 दिवस महत्त्वाचे - IMD

12 एप्रिलपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट...नागरिकांनी काळजी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन

Updated: Apr 10, 2022, 10:03 AM IST
राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुढचे 5 दिवस महत्त्वाचे - IMD  title=

मुंबई : राज्यात कोकणात अवकाळी पावसाचं संकट आहे तर दुसरीकडे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. राज्याचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक चिंताजनक बातमी आहे. 

आयएमडीनं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आजपासून 12 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. उन्हाच्या तीव्र झळा कायम असताना किमान तापमाना मोठी वाढ झाली आहे. रात्री देखील उकाड्याने हैराण होत असल्याने झोप लागत नाही.

वाशिम, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान 42 अंशाहून अधिक आहे. अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण विदर्भात आणखी 5 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिला.