कोल्हापूर : शहरातील महाद्वार रोडवर एक जुनी इमारत उतरून घेत असताना भिंत कोसळली आहे. ही भिंत कोसळून असतानाचा थरारक व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. सुमारे पंधरा फुटावरील उंच भिंत कोसळल्याने मोठा आवाज झाला, याच दरम्यान इमारतीखाली दोन नागरिक उभे होते. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करत आवाज दिल्याने हे दोन्ही नागरिक बाजूला झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (Wall of old dangerous building collapses in Kolhapur, video viral)
दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. शहरातील धोकादायक इमारती उतरून घेत येत असताना नेमकी काळजी काय, घ्यावी याची सूचना कोल्हापूर महानगरपालिकेने संबंधित धोकादायक इमारतींच्या मालकांना देणे गरजेचं होते, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
किमान यापुढे तरी कोल्हापूर महानगरपालिका शहरातील 120 धोकादायक इमारती उतरून घेत असताना काळजी घेईल अशी अपेक्षा आपण या घटनेच्या निमित्ताने व्यक्त करू शकतो.