Wainganga River Water Tourism Project : भंडा-यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे. नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेत भंडारा जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
वैनगंगा नदीवरील हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आमदार नरेंद्र भोंडेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा जल पर्यटन प्रकल्प ओळखला जातो.. या जल पर्यटनाच्या पहिल्या टप्प्याला 182 कोटीची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
वैनगंगा नदीवरील जल पर्यटन निर्मिती पहिल्या टप्प्यासाठी 102 कोटी रूपये मंजूर झाले होते. याच कामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कऱण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वतः बोटीतून प्रवास केला होता..
उजनी धरण जलाशय पर्यटन विकासासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. उजनी धरण जलाशयातून पर्यटकांना क्रूज, बोटची सफारी, वॉटर स्पोर्टस करता येणारेत. उजनी धरण परिसरात मोठं पॅव्हेलियन उभारण्यात येणारेय. तसंच देशातील सर्वात मोठा जलतरण तलावही उभारण्यात येणारेय. आता जागा निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू होणारेय.
साता-यातील तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी तराफा बोट शिवसागर जलाशयत सज्ज झालीये... ही बोट जिल्हा परिषदेनं नव्यानं बनवून घेतलीये... यामध्ये सुमारे 95 प्रवासी बसू शकणारे.. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या बोटीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.