Virar Crime News : खासगी क्लासेसच्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. विरारमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थनिकांनी शिक्षकाला चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, शालेय विद्यार्थींनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बदलापूरच्या घटनेनंतर लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. कारण शाळेतही मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतही गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे.
विरार पूर्वेच्या कारगील नगर परिसरात असलेल्या एका खाजगी क्लासेसमध्ये हा शिक्षक हिंदी विषय शिकवत होता. पीडित मुलगी क्लासेस मध्ये असताना या हिंदीच्या शिक्षकाने तिला किस केलं होत. मुलगी दोन दिवस क्लासेसलां जात नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिची खोदून चौकशी केली असता तिने सर्व प्रकार सांगितला.
विनयभंगाचे हे प्रकरण उघडकीस आल्यनंतर नागरिकांनी या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून बेदम चोप दिला. त्याचबरोबर शिक्षकाची धिंड काढत नागरिकांनी शिक्षकाला पोलीसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल ही करण्यात आला आहे.. मात्र या प्रकाराचा तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात असून, तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
बदलापूरनंतर पुण्यातही एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. 15 ऑगस्टला भवानी पेठ परिसरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. तर तिकडे अकोला जिल्ह्यातील काजीखेड मधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.... याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेय.. हा शिक्षक 8 वीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवात होता. आणि त्यांचं शोषण करत असल्याचं समोर आलंय..