Video : 10 फुटी अजगराने गिळले तीन ससे आणि...

Python Swallows Rabbits in Nagpur ​: आपण अनेकवेळा पाहिले किंवा ऐकले आहे की, अजगराने शेळीला गिळले. तसेच अन्य प्राण्यांना गिळल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. असाच आणखी एका घटनेत अजगर ससा गिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

Updated: Oct 1, 2022, 12:44 PM IST
Video : 10 फुटी अजगराने गिळले तीन ससे आणि... title=

 नागपूर : Python Swallows Rabbits in Nagpur’s Khumari Village : आपण अनेकवेळा पाहिले किंवा ऐकले आहे की, अजगराने शेळीला गिळले. तसेच अन्य प्राण्यांना गिळल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. असाच आणखी एका घटनेत अजगर ससा गिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याच्या खुमारी शिवारातील एका रिसॉर्टवरील फार्म हाऊसवर अजगराने तीन ससे गिळून कुंडली मारुन बसल्याच्या व्हिडिओ समोर आला आहे. 

अजगरला पाहून घाबरलेल्या फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे प्राणी मित्र राहुल कोठेकर आणि अजय मेहरकुळे यांना माहिती दिली. या फार्म हाऊसवरील ससाच्या पिंजऱ्यात जाऊन  या अजगराने तीन सस्यांना गिळंकृत करुन अजगर एकाच ठिकाणी बसून होता. 

अजगराला सर्पमित्रांनी शिताफीने  पकडले. अजगराने गिळले ससे बाहेर काढल्यानंतर अजगराला जंगलात सोडून देण्यात आले. हा भला मोठा अजगर सुमारे 10 फुटाचा असून फार्म हाऊसवर अजगराला पाहून चांगलेच धास्तावले होते.