मुंबई : Milind Narvekar Will Join Shinde Group? : शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर हेही आमच्याकडे येणार अशी चर्चा असल्याचे पाटलांनी म्हटले आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर 15 पैकी पाचही आमदार ठाकरेंकडे शिल्लक राहणार नसल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला आहे. शिवसेना ही आमची आहे, बाळासाहेब ठाकरे हे कोणाची एकट्याची मालमत्ता नाही. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही महाराष्ट्रात काम करत आहोत, असा दावा पाटील यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी चर्चा सुरु झाली आहे.
मागील 15 दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन दोनवेळा भेट घेतली होती. याचवेळी नार्वेकर हे शिवसेनेमधून फुटणार, अशी चर्चा राजकीय होती. शिवसेना कोणाची याबाबत संघर्ष तर सुरु असताना उद्धव ठाकर यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार का, याची चर्चा पाटील यांच्या विधानानंतर सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर शिवसेनेना सोडतील की, शिवसेनेला बळकटी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील याकडे सर्व राजकीय पक्षांच लक्ष असणार आहे.