मुसळधार पावसात ऑर्डर घेऊन फिरणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने काय केलं पाहा; Video Viral

Relax Station For Delivery Boys: मुसळधार पावसात न थांबता ग्राहकांची ऑर्डर पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने एक भन्नाट आयडिया लढवली आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 14, 2023, 10:36 PM IST
मुसळधार पावसात ऑर्डर घेऊन फिरणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने काय केलं पाहा; Video Viral title=
Viral Video Man Sets Up Relax Station For Food Delivery Boys Working Amid Rains

Relax Station For Delivery Boys: मुसळधार (Mumbai Rain) पावसात सर्वच नागरिकांची तारांबळ उडते. याच पावसात डिलिव्हरी बॉय (Food Delivery Boy) ग्राहकांच्या ऑर्डर्स देत फिरत असतात. ग्राहकांची ऑर्डर वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. पाण्या पावसाच्या दिवसात त्यांच्या मार्गात अनेक अडचणी येतात. त्यावर तोडगा काढत ते कस्टमरपर्यंत ऑर्डर पोहोचवतात. सोशल मीडियावर (Social Media Viral Video) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भरपावसात ग्राहकांची ऑर्डर्स घेऊन फिरणाऱ्या डिलिव्हरी एजेंटसाठी एका तरुणाने मदतीचा हात देऊ केला आहे. त्याच्या या कामासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या तरुणाचे नाव सिद्धेश लोकरे (Siddhesh Lokare) असं असून तो एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. 

सिद्धेश लोकरेने कुर्ला स्टेशनच्याबाहेर एक छोटा रिलॅक्स स्टेशन बनवले आहे. रस्त्यालगतच असलेल्या या रिलॅक्स स्टेशनमध्ये डिलिव्हरी एंजटना चहा, समोसा आणि नाश्ता आणि रेनकोट देण्यात येतो. सिद्धेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

सिद्धेशने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओसोबत एक कॅप्शनही लिहलं आहे. मी भारताच्या खऱ्या हिरोंसाठी एक रिसॅक्स स्टेशन बनवले आहे. हे रिलॅक्स स्टेशन आपल्या डिलिव्हरी नेटवर्कने दाखवलेल्या शौर्याचे आणि मेहनतीचा परिणाम आहे. ज्यांच्यामुळं आपल्याला आरामात घरबसल्या जेवण मिळते. मान्सून व गरमीची पर्वा न करता ते हे काम करण पसंत करतात, असं सिद्धेशने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने थोडा आराम कर लो अशी टॅगलाइनदेखील दिली आहे.  

सोशल मीडियावर सिद्धेशचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 5 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेक युजर्सनी त्याचे कौतुक केले आहे. सिद्धेशच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. काहींनी मी सुद्धा अशाप्रकारे मदत करु शकतो का?, असं सिद्धेशला कमेंट करत विचारलं आहे. तर, एकाने तुझ्याकडून हे खूप शिकण्यासारखं आहे. तु खूप चांगले काम करत आहेत, असं म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वाढदिवसाच्या दिवशी ग्राहकांना चॉकलेट वाटून वाढदिवस साजरा केला होता. करण आपटे असं या डिलिव्हरी एजेंटचे नाव होते.  ग्राहकांच्या प्रत्येक ऑर्डरसोबत तो एक चॉकलेट देत होता. फेसबुकवरही त्याने एक स्पेशल नोट लिहली होती. माझा वाढदिवस होता. मी आज नवीन शर्ट घेतला आहे. तसंच, मी डिलिव्हर केलेल्या प्रत्येक ऑर्डरसोबत मी एक चॉकलेट दिलं आहे, असं त्याने लिहलं आहे.