Viral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.

Updated: Mar 26, 2023, 05:10 PM IST
Viral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ title=
Viral Video little girl angry on Sarja Khan

Trending Video of Little Girl: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. 400 वर्षानंतर देखील ज्यांच्यासमोर प्रत्येकाची मान आदराने खाली जाते, असं एक महान व्यक्तीमहत्त्व! गेल्या काही दिवसांपासून शिवरायांवर अनेक चित्रपट (Movies) निर्मित होत असल्याचं पहायला मिळतंय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात देखील या चित्रपटांची क्रेझ पहायला मिळते. अशातच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला, त्याची माहिती देतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसत आहे.

नेमकं काय आहे VIDEO मध्ये?

कुणाचा राग आलाय? माझा? असा सवाल चिमुकलीच्या आईने विचारला. त्यावेळी  चिमुकली वरच्या स्वरात सर्जा खान याचं नाव घेतलं. कोण आहे सर्जा खान? असा सवाल विचारल्यावर 'ज्याने हंबारराववर वार केलाय', असं चिमुकली म्हणाली. आपण तलवारीने त्याच्यावर वार करायचा. आपल्याला मोठीशी तोफ तर आणावीच लागेल, अशी लहान मुलगी म्हणताना दिसत आहे.

तलवारीशिवाय सर्जा खान काय मरणार नाही. तोफ आणायची आणि सर्जा खानला मारायचं का? असा प्रश्न मुलीला विचारण्यात आला. त्यावेळी भूवयाची चतुर आणि गंभीर कलाकारी दाखवत उत्तर दिलं. कसंबसं करून आपल्याला त्याला मारावंच लागेल. नाहीतर काहीही उपयोग नाही.

पाहा VIDEO -

तो खूप डेन्जल हाय ना... त्यामुलं त्याला मालावंच लागेल. तो शिवाजी महाराजांना पण मालू शकतो, असं बोबड्या सुरात मुलगी म्हणताना दिसत आहे. सर्जा खान किती उंच आहे, जाडा हुप्प आहे. त्याला मारावंच लागेल, असं चिमुकली म्हणताना दिसत आहे. सध्या या चिमुकलीचा व्हिडिओ महाराष्ट्रात (Maharastra Trending Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.