Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Updated: Apr 18, 2023, 02:24 PM IST
Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का? title=
viral video Little Boy dance mala bai darudyaa bhetlay Ahirani Hits Songs trending video on Social media

Dance Viral Video : मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हणतात. खरंच किती निरागस असतात ही मुलं...लहान मुलांना बघताक्षणीच मनं कसं प्रसन्न होऊन जातं. त्यांचे बोबडे बोल, ते निरागस प्रश्न त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावतं. लहान मुलांचे सोनेरी क्षण हे प्रत्येक आई वडिलांसाठी मोलाचे असतात. 

असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. शाळेचे कपडे आणि पाठीवर शाळेची बॅग घेतलेला हा चिमुकल्याने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. 

'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'

अहिराणी लोकगीत 'मला बाई दारुड्या भेटला नवरा माझं नशीब फुटलं गं...'(mala bai darudyaa bhetlay)  हे गाणं सुरु झालं आणि चिमुरड्याने जे काही भन्नाट डान्स केला आहे. या गाण्यावर हाताची आणि डोळ्यांची जी हालचाल केली आहे, ते पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील amol__lengare या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 4 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या लहान मुलाचा निरागसपणा आणि डान्स पाहून आयुष्य असावे तर इतकं बिनधास्त असं वाटतं...