धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना, 24 बोटांचे बाळ आले जन्माला

Medical Miracle : धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. चक्क 24 बोटांचे बाळ जन्माला आलंय. महत्त्वाची बाब म्हणजे हात व पायाच्या बोटाला प्रत्येकी ६ बोटे आहेत. 

Updated: Nov 23, 2023, 04:05 PM IST
धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना, 24 बोटांचे बाळ आले जन्माला title=

गर्भवती महिला असली की, तिची सुटका सुखरुप व्हावी हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण नैसर्गिक चमत्कार कधी कधी असे घडतात की. त्यासमोर प्रत्येकजणच हात टेकतो. अशीच घटना मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. त्याला कारण आहे नुकतंच जन्माला आलेलं बाळ. 

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. चक्क 24 बोटांचे बाळ जन्मला आले असून त्या बाळाच्या हात आणी पायाला प्रत्येकी 6 बोटे आहेत. रेणुका सागर विटकर असे बाळाच्या आईचे नाव असून ही त्यांची दुसरी प्रसूती आहे. बाळाचा जन्म होताच सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागलीय. बाळाच्या प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी 6 बोटे आहेत..म्हणजेच प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी एक बोट अधिक दिसून येते. दरम्यान जन्मलेले बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत.

रेणुका विटकर यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा हे आहे तर सोलापुर हे सौ.विटकर यांचे सासर आहे. या कुटुंबाची सध्या जोरदार चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बाळ म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद असल्याचही मानलं जात आहे. बाळाचा जन्म हा कायमच आईसाठी खास असतो. त्यामुळे आपलं बाळ जन्माला येताच चर्चेत आल्याचा देखील या कुटुंबाला वेगळाच आनंद आहे.