राणा दाम्पत्याकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आता नक्की काय झालं?

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि वाद हे असं समीकरणच गेल्या काही दिवसांपासून तयार झालंय. 

Updated: May 28, 2022, 11:15 PM IST
राणा दाम्पत्याकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आता नक्की काय झालं?  title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि वाद हे असं समीकरणच गेल्या काही दिवसांपासून तयार झालंय. हनुमान चालिसा वादानंतर अमरावतीत 36 दिवसांनी पोहचलेल्या राणा दाम्पत्यांनी पुन्हा एकदा नियमांचं उल्लंघन केलंय. राणा दाम्पत्यानं पुन्हा नियम बसवले धाब्यावर बसवले आहेत. (violation of rules by mp navneet rana and mla ravi rana in amravati attention to role of police)

नक्की प्रकरण काय?

राणा दाम्पत्य 36 दिवसानंतर आपला मतदारसंघ असलेल्या अमरावतीत पोहचले. यानंतर त्यांचं युवा स्वाभिमान पार्टीकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर रामा दाम्पत्यांनी हनुमान चालिसेचं पठण केलं. 

पक्षाचे कार्यकर्त्यांचा आणि अमरावतीकरांचा उत्साह इतका होता की रात्री 10 वाजल्यानंतरही राणा दाम्पत्याची स्वागताची मिरवणूक सुरू होती. रात्री 10 नंतर कोणत्याच जाहीर कार्यक्रमाला आणि मिरवणुकीला परवानगी नसते. मात्र त्यानंतरही मिरवणूक काढल्याने राणा दाम्पत्यांनी नियमांचं उल्लंघन केलंय.

प्रकरण इतक्यावरच थांबलंय नाही, तर रात्री उशिरा 10 नंतर बंदी असतानाही राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण केलं. त्यामुळे आता अमरावती पोलीस राणा दाम्पत्याविरोधात काय कारवाई करणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.