पीडित मुलीला दुसऱ्या शाळेत सामावून घेणार- विनोद तावडे

 प्रकृती बरी झाल्या नंतर तिला जवळच्या दुसऱ्या शाळेत प्रवेश देणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2017, 01:20 PM IST
 पीडित मुलीला दुसऱ्या शाळेत सामावून घेणार- विनोद तावडे  title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या पीडित विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत आणलं जाणार आहे. २४ नोव्हेंबर ३०० उठाबशा काढल्या नंतर ती कोसळली.

त्यानंतर आजतागायत तिचे पाय लटपटतायत. तिला चालता येत नाही.

दरम्यान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे.

५०० उठाबशांचा आदेश

शाळेत वही आणायला विसरल्याचा क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थिनीला, कानूर बुद्रुक इथल्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ शाळेची मुख्याध्यापिका अश्विनी देवणे यांनी तब्बल ५०० उठाबशा काढायचा आदेश दिला होता. 

दुसऱ्या शाळेत प्रवेश देणार

'आता पुन्हा त्याच शाळेत जायला ती विद्यार्थिनी धजावणार नाही.  तिची प्रकृती बरी झाल्या नंतर तिला जवळच्या दुसऱ्या शाळेत प्रवेश देणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.  

वडिलांनाही सामावून घेणार

ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेतच त्या विद्यार्थिनींचे वडील शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यांना ही नोकरी जाण्याची भीती वाटतेय.

कारण ज्या शिक्षिकेने हा प्रकार केला तिचे पती त्या शाळेचे सचिव आहेत.

मात्र 'त्यांची नोकरी जाणार नाही.आम्ही दुसऱ्या शाळेत त्यांना सामावून घेणार आहोत',असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

मुंबईत उपचार 

दरम्यान पीडितेच्या तपासणीचे सर्व रिपोर्ट नॉरमल आहेत. आता निरोफिजिशन सल्ल्यानं तिच्यावर मुंबईत उपचार होणार आहेत. 

आता पुन्हा त्याच शाळेत जायला ती विद्यार्थिनी धजावणार नाही त्यामुळे जवळच असणाऱ्या दुसऱ्या शाळेत तिची प्रकृती बरी झाल्या नंतर तिला प्रवेश देणार