संतप्त ग्रामस्थांकडून शिवशाही बसची तोडफोड

मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. शिवशाही बसच्या धडकेने इसमाचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Sep 15, 2018, 05:11 PM IST
संतप्त ग्रामस्थांकडून शिवशाही बसची तोडफोड title=

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. शिवशाही बसच्या धडकेने इसमाचा मृत्यू झाला आहे. लहू दरवडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. महार्गावरच्या कल्हे गावाजवळ अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको करून शिवशाही बसची तोडफोड केली. शिवशाही बसचं अपघात थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. 

शिवशाहीला खासगी चालक

या बसच्या चालकांना एसटीकडून वाहन चालवण्याचं अधिकृत प्रशिक्षण नसल्याने अपघात वाढले असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवशाही बसला खासगी ड्रायव्हर असल्याने शिवशाही बस सेवेवर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टीका होता आहे.

संबंधित लेख - रावतेसाहेब बाळासाहेबांनी ही 'शिवशाही' बंदच केली असती...!

निदान दिवाळीपर्यंत तरी..

गणपतीत तरी शिवशाहीचे अपघात ऐकण्यास मिळणार नाहीत, असं वाटत असताना, एसटी प्रशासनाने शिवशाहीला खासगी चालकांच्या हाती देणे सुरूच ठेवले आहे. निदान दिवाळीपर्यंत तरी शिवशाहीच्या सर्व बस चालकांना एसटीकडून अधिकृत प्रशिक्षण देण्यात येईल ही अपेक्षा आता प्रवासी व्यक्त करीत आहेत.

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

तर दुसरीकडे रायगड़ जिल्ह्यातच मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झालाय. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर रसायनी जवळ पहाटे ४ वाजता अपघात झाला. होंडा सिटी कारने पुढे चाललेल्या वाहनाला धडक दिली. कारमधील ४ जण जखमी झालेत.जखमींमध्ये पालघरचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत देसाई यांचा समावेश आहे. देसाई यांना गंभीर दुखापत झालीय.