दिराकडून माझा लैंगिक छळ, विद्या चव्हाणांच्या सुनेचा गंभीर आरोप

 विद्या चव्हाणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा टोला

Updated: Mar 3, 2020, 07:52 PM IST
दिराकडून माझा लैंगिक छळ, विद्या चव्हाणांच्या सुनेचा गंभीर आरोप  title=

मुंबई : सुनेचे विवाहबाह्य संबंध होते असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला होता. यावर त्यांची सुन डॉ. गौरी चव्हाणने स्पष्टीकरण दिले आहे. विवाहबाह्य संबंधांचे आरोप खोटे आहेत. विद्या चव्हाणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

दिराने माझा लैंगिक छळ केल्याचा आरोप गौरी चव्हाण यांनी केलाय. आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही त्या म्हणाल्या. न्याय हवाय यासाठी लढा देणार असल्याचेही डॉ, गौरी चव्हाण म्हणाल्या. 

आधी पोलिसांनी एफआयआर घेतली नाही. नंतर प्रज्ञा अजिंक्य यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केल्यावर एफआयआर दाखल करु घेतल्याचे गौरी यांचे वडील अरुण सावंत यांनी सांगितले. मला आणि मुलीला धक्के देत मारत बाहेर काढल्याचेही सावंत म्हणाले.

गुन्हा दाखल 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. नातू हवा म्हणून सुनेचा छळ केल्याचा आमच्यावरील आरोप खोटा आहे. माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलाने घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेने आरोप केल्याचे विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले. गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणे शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलं. त्यामुळे मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले.

माझ्या मुलाने यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकिलांशी संपर्कदेखील साधला होता. त्यामुळे सूनेने आपल्यावर खोटे आरोप केले. नवरा बायकोच्या वादात मला गोवण्यात आले. दुसरी मुलगी झाली म्हणून सूनेचा छळ केला, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे, असेही विद्या चव्हाण यांनी सांगितले. 

माझी सून कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळे असे वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गाने हा लढा सुरूच राहील, असे विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले.