Video : पुण्यात थरार! भररस्त्यात गुंडांचा गोळीबार, उच्चभ्रू भागात पूर्ववैमनस्यातून गुंडांची हाणामारी

Crime News : पुण्यामध्ये फायरींग करत गुंडाचा तुफान राडा सीसीटीव्ही कैद झाला आहे. या घटनेचं Exclusive फूटेज  झी24 तासाच्या हाती लागले आहे.

Updated: Nov 25, 2022, 12:20 PM IST
Video : पुण्यात थरार! भररस्त्यात गुंडांचा गोळीबार, उच्चभ्रू भागात पूर्ववैमनस्यातून गुंडांची हाणामारी title=
Video Pune Crime Shooting gangwar in Pune fight between two groups nmp

Pune Crime : पुण्यातून धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यामध्ये फायरींग करत गुंडाचा तुफान राडा सीसीटीव्ही (CCTV) कैद झाला आहे. या घटनेचं Exclusive फूटेज  झी24 तासाच्या हाती लागले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

पुणे शहरातील उच्चभ्रू असलेल्या कोरेगाव परिसरात वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्रीच्या सुमारास दोन गटात पूर्ववैमनस्यातून तुफान राडा झाला. भर रस्त्यात वाहतूक सुरू असताना ही मारहाण करण्यात आली. यावेळी गुंडांनी हवेत गोळीबारही केला. आरोपी सोन्या दोडमणी याने त्याचेकडील कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला.  याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ( Video Pune Crime Shooting gangwar in Pune fight between two groups)

थरकाप उडविणारा व्हिडीओ

यापूर्वीही अशीच घटना घडली

 गेल्या रविवारी 15 नोव्हेंबरला मध्यरात्री पुण्यामध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक तरुण कोयत्याने वार करत असल्याचं दिसून आलं. या घटनेनंतर बुधवार पेठ परिसरामध्ये दहशत पसरली आहे. एकाच महिन्यात दोन घटना घडल्यामुळे पुण्यात पोलिसांचा धाक राहिला आहे की, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.