महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ

पोलीस खुलेआम पैसे असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालाय.  शहरातल्या शिवाजी चौकात महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. 

Updated: Jul 27, 2017, 09:38 PM IST
महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा व्हिडिओ  title=

लातूर : पोलीस खुलेआम पैसे असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालाय.  शहरातल्या शिवाजी चौकात महिला वाहतूक पोलीस पैसे घेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. 

संबंधित महिला वाहतूक पोलीस कर्मचारी शिवाजी चौकात आपली ड्युटी करत असताना पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीकडून पैसे घेऊन आपल्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

यासंदर्भात लातूर वाहतूक पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता वाहतूक नियम तोडल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर 50 रुपये घेत असल्याची सारवासारव त्यांनी केलीय. 

प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये ना पावती दिसतेय ना पावती पुस्तक. पण तरी देखील पावती फाडून ५० रुपये घेत असल्याचा दावा वाहतूक पोलीस निरीक्षक करीत आहे. या महिला कर्मचा-यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.