Video : शेतकऱ्याच्या घरात शिरला बिबटा, पळ काढणार इतक्यात...

मोडकळीस आलेल्या कौलारु शेतकऱ्याच्या घरात शिरला बिबटा.

Updated: Nov 20, 2022, 11:13 AM IST
Video : शेतकऱ्याच्या घरात शिरला बिबटा, पळ काढणार इतक्यात... title=
video a leopard entered the farmers house was about to run away nz

चेतन कोळस, येवला (नाशिक), झी मीडिया : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पश्चिम भागातील हिवरे फाटयाजवळील एक शेतकऱ्याच्या घरात नर बिबटा आढळला. शेतकऱ्याच्या मोडकळीस आलेल्या कौलारु घराच्या पडवीत हा बिबटा सापडला. बिबटा सापडताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा अडीच वर्षाचा हा बिबटया जखमी आवस्थेत आढळून आल्याने वनविभागाच्या वतीने फिजिकल ऑपरेशन करुन जखमी बिबटयाची रवानगी मोहदरी येथील वनउद्यानात करण्यात आले. सध्या त्या जखमी बिबट्यावर उपचार सुरु आहेत. (video a leopard entered the farmers house was about to run away nz)

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पश्चिम भागातील हिवरे फाटयाजवळील एक शेतकऱ्यांच्या मोडकळीस आलेल्या कौलारु घराच्या पडवीत नर जातीचा अडीच वर्ष वयाचा बिबटया जखमी आवस्थेत आढळून आल्याने वनविभागाच्या वतीने फिजिकल ऑपरेशन (सेयरा व जाळीच्या साहाय्याने) ऑपरेशन करुन जखमी बिबटयाची रवानगी मोहदरी येथील वनउघानात करण्यात आली असून त्या ठिकाणी जखमी बिबटयावर उपचार करण्यात येत आहे.

हे ही वाचा - Video : पुण्यात 12 फुटी अजगर सापडला आणि....

हिवरे फाटा येथील शेतकरी वाळीबा मारुती पाटोळे यांनी आपल्या गट नंबर 1533 मध्ये घर बांधलेले असून त्या घरात कोणीही वास्तव्यास नाही. गोपी बाळासाहेब पाटोळे हे सकाळी आठ वाजता आपली बैलजोड घेऊन शेतात चालला होता.त्याला आचानक बिबटया बांधाच्या कडेला दिसला. त्यानंतर बिबटयाने वाळीबा पाटोळे यांच्या मोडकळीस आलेल्या कौलारु घराच्या भिंतीवरुन उडी मारली व घराच्या पडवीत गेला. त्यानंतर बिबटया पडवीत असल्याची खातरजमा झाल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

 

त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बिबटयाला पकडण्यासाठी जाळी लावली व फिजिकल आँपरेशन करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर वनपरिक्षेञ अधिकारी मनिषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील इको टिम यांच्या वतीने फिजिकल ऑपरेशन करण्यात आले. सेयरा व जाळीच्या साहाय्याने जखमी आवस्थेत असलेल्या बिबटयाला पकडण्यात यश आले.