कोकण विभागीय आयुक्त रजेवर, मनसे फुटीर नगरसेवक सुनावणी लांबली

Updated: May 14, 2018, 02:16 PM IST

पालघर :  मनसेतून फुटून शिवसेनेत दाखल झालेल्या 6 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याबद्दलही आजच कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी होणार होती. पण कोकण विभागीय आयुक्त रजेवर गेल्याने मनसे फुटीर नगरसेवकांची सुनावणी लांबणीवर गेली आहे. मनसेनं फुटीर नगरसेवकांप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागताना दोन याचिका दाखल केल्या होत्या. फुटीर नगरसेवकांच्या गटाला मान्यता देण्यात येऊ नये, तसंच या नगरसेवकांनी केलेलं पक्षांतर बेकायदेशीर असल्यानं त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावं. या दोन याचिकांपैकी फुटीर नगरसेवकांच्या गटाला मान्यता देत कोकण विभागीय आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी एक प्रकरण निकाली काढलं होतं. तर फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्याचं प्रकरण प्रलंबित राहणार आहे. 

सेनेच संख्याबळ वाढलं

फुटीर नगरसेवकांच्या गटाला मान्यता मिळाल्याने मुंबई महापालिकेत काठावरचे बहुमत असलेल्या शिवसेनेला दिलासा मिळाला होता. शिवसेना आणि पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचं मिळून एकूण संख्याबळ ९३ झालं आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांपुढे होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.