पेट्रोल नाही तर खाद्य तेलावर धावणार गाड्या

 इंडियन ऑईलची नवी मोहीम 

Updated: Dec 14, 2019, 11:32 AM IST
पेट्रोल नाही तर खाद्य तेलावर धावणार गाड्या title=

मुंबई : खाद्य तेलामुळे फक्त शारीरिक स्वाथच नाही तर तुमच्या खिशाचं स्वास्थ देखील सांभाळणार आहे. कारण आता खाद्यतेलाचा वापर तुम्ही गाडीतील इंजिनमध्ये देखील करू शकता. इंडियन ऑईलतर्फे एक विशेष मोहिम देखील राबवण्यात आली आहे. 

या वापरलेल्या तेलातून बायोडिझेल बनवण्यात येणार आहे. याकरता इंडियन ऑईल मोठ मोठ्या हॉटेल मालकांशी आणि दुकानदारांशी संपर्क साधणार आहे. त्यांना जागरूक करण्यासाठी अभियान सुरू केलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास यामार्फत फक्त पर्यावणार राखले जाईल असं नाही तर मानवाचं स्वास्थ देखील चांगल राहिल. तसेच गाडी चालवण्यासाठी लोकांना डिझेलसोबत बायोडिझेलचादेखील वापर करता येईल. 

पुऱ्या, छोले भटुरे यासारखे तळलेले पदार्थ कुणाला खायला आवडत नाहीत. पण तळलेले पदार्थ शरीरासाठी कायम घातक असतात. तळलेल्या तेलाचा वापर हा जास्तीत जास्त तीन वेळा करावा. त्यापेक्षा वापरलेल्या तेलाचा वापर करू नये. 

पण रोडवरती खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते याचा विचार करत नाहीत. एकदा कढईत ओतलेलं तेल अगदी सुकेपर्यंत वापरलं जातं. पण हे तेल शरीराला त्रासदायक आहे. या तेलामुळे ऍसिडिटी, हृदय रोग, ब्लॉकेज, अल्झायमर, गळ्याला या तेलाचा त्रास होतो, कॅन्सर, बॅड कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या उद्भवतात. 

एवढंच नाही तर हे तेल ड्रेनेजमध्ये टाकलं तर पाणी, जलचर आणि मातीला देखील याचा त्रास होऊ शकतो. एक लीटर वापरलेलं खाद्यतेल 10 लाख लीटर स्वच्छ पाणी प्रदूषित करतात. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात वापरलेल्या तेलाचे एकत्रीकरण केले जाणार आहे. आइओसी हे एकत्र करून यामार्फत बायोडिझेल तेल तयार करणार आहे. आठ वर्षात वापरलेल्या तेलातून इतका बायोडिझेल मिळेल की त्यानंतर आयात करण्यावर 10 टक्के परिणाम होईल.