वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जमीन देण्याचा निर्णय वादात

जालना जिल्ह्यात ५१ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात सापडण्याची चिन्ह 

Updated: Feb 6, 2020, 02:08 PM IST
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जमीन देण्याचा निर्णय वादात title=

जालना : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जालना जिल्ह्यात ५१ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात सापडण्याची चिन्ह आहेत. १० कोटींच मूल्य असलेली ही जमीन विशेष बाब म्हणून अल्पदरात देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. विशेष म्हणजे अर्थ आणि महसूल विभागानं ही जमीन देण्यासंदर्भातल्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेतले होते. 

मात्र हे आक्षेप अमान्य करण्यात आले आहेत. संशोधनासारख्या जनहिताच्या बाबीसाठी ही जमीन वापरली जाणार असल्याचं मंत्रिमंडळानं ही जमीन देण्यास मंजुरी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या इन्स्टिट्युटचे अध्यक्ष आहेत. 

तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या संस्थेशी निगडीत आहेत. पुण्यातल्या वंसतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही जमीन देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

त्यानुसार राज्य सरकारनं हा निर्णय़ घेतलाय. तर ऊस संशोधनाच्या वाढती गरज लक्षात घेता संस्थेचा विस्तार होणं महत्त्वाचं असल्यानं जागा देण्याचा निर्णय झाल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिलीय.