कारगिल विजय दिन, २६ जुलैला सिनेमागृहात मोफत दाखवला जाणार 'उरी'

उरी, द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा राज्यात मोफत दाखवला जाणार.

Updated: Jul 24, 2019, 04:14 PM IST
कारगिल विजय दिन, २६ जुलैला सिनेमागृहात मोफत दाखवला जाणार 'उरी' title=

मुंबई : येत्या २६ जुलैला विसावा कारगिल विजय दिवस देशभरात साजरा होणार आहे. त्या प्रित्यर्थ राज्य सरकारने नुकताच सिनेमागृहात गाजलेला उरी, द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा राज्यातल्या सिनेमागृहात मोफत दाखवण्याचं ठरवलं आहे. सकाळी १० वाजता राज्यातल्या सर्व सिनेमागृहात हा सिनेमा मोफत दाखवण्यात येणार आहे. 

विद्यार्थी, तरूणांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. याची पूर्वतयारी म्हणून चित्रपटगृहाचे चालक, महाविद्यालय प्राचार्य यांची बैठक आयोजित करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कारगिल विजय दिनानिमित्त राज्य सरकारच्या माजी सैनिक कल्याण विभागातर्फे राज्यात ४०० ठिकाणी 'उरी' सिनेमा मोफत दाखवला जाणार आहे. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानी घुसखोरांना काश्मीरमधून हुसकावून लावत भारतीय सैन्याने विजय मिळवला होता. या ऐतिहासिक घटनेचं हे २० वे वर्ष आहे. १५ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना हा सिनेमा मोफत दाखलवा जाणार आहे.