राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain  :  नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2023, 08:44 AM IST
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू title=

Maharashtra Unseasonal Rain  : नागपूर शहरात झालेल्या तुफानी अवकाळी पावसामुळे भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. गोंडवाना चौक जीपी हाइट्स इथे ही दुर्घटना घडली. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. रात्री शहरातल्या अनेक वस्त्या अंधारात बुडाल्या होत्या. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा शहराला जोरदार तडाखा बसला. नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसातनंतर शहराला वादळी पावसामुळेच हाहाकार उडाला. अचनाक आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

 येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येतंय. तर दुसरीकडे उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

विजांच्या कडकडाटासह पाऊस

गोंदिया जिल्ह्यात संध्याकाळपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. या पावसामुळे नागरीकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे मालेगाव, मंगरुळपिर, मानोरा तालुक्यातल्या फळबागा आणि इतर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसंच रिसोड तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. तर मंगरुळपिर तालुक्यात चिखली शेतशिवारात निंबाच्या झाडावर वीज पडली. 

सांगली, शिरुरमध्ये जोरदार पाऊस

सांगलीच्या मिरजेत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मिरज शहरात काही भागात गारांचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पुण्याच्या शिरुरमध्ये दिवसभर उष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना, संध्याकाळी मात्र जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने शेतक-यांची धावपळ उडाली. शेतात कांद्याची काढणी सुरु असल्याने कांद्यालाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे.